tiger shroff was seen sleeping on the floor mother ayesha shroff shared picture avb 95

0
29
Spread the love

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो चक्क जमिनीवर झोपला असल्याचे दिसत आहे. हा फोटो टायगरची आई आयशा श्रॉफ यांनी शेअर केला आहे. हा फोटो जून असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

आयशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टायगरचा जमिनीवर झोपलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी छान असे कॅप्शन दिले आहे. ‘मेहनत केल्यावर चांगली झोप लागते. मला तुझा अभिमान वाटतो’ असे त्यांनी फोटो शेअर करत म्हटले आहे. पण फोटो कोणत्या चित्रपटाच्या सेटवरील आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

या फोटोमध्ये टायगर श्रॉफ उन्हात जमिनीवर झोपलेला दिसत आहे. त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. टायगरचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला असल्याचे दिसत आहे.

आयशा या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी त्यांनी जॅकी श्रॉफ यांचा थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. तसेच त्या नेहमी मुलगी कृष्णाचे देखील फोटो शेअर करताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 9:18 am

Web Title: tiger shroff was seen sleeping on the floor mother ayesha shroff shared picture avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)