Transportation of Stray Dogs: संगमनेरमधील मोकाट कुत्री अकोले तालुक्यात सोडली; लोकांना वेगळाच संशय – ahmednagar: one booked for illegal transportation of stray dogs from sangamner to akole

0
29
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, नगर

करोनाचा उद्रेक वाढत असलेल्या संगमनेरमधील मोकाट कुत्री टेम्पोत भरून अकोले तालुक्यातील कुंभेफळ, सुगाव, कळस आणि रेडे या चार गावांमध्ये सोडताना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. काल रात्री उशिरा हा प्रकार घडला असून या प्रकरणी अकोले पोलीस स्टेशनला प्राण्यांना निर्दयतेने वागवणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्ताप शेख (वय ४२, रा.कुरण रोड, संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, करोनाग्रस्त भागातील कुत्रे गावामध्ये सोडण्याचा प्रयत्न झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

वाचा: नगरसेवकांची फोडाफोडी! मनसेनं चोळलं शिवसेनेच्या जखमेवर मीठ

संगमनेरहून निघाल्यावर कळसमार्गे कुंभेफळहून अकोलेकडे येत असताना कुंभेफळजवळ असणाऱ्या ओढ्याजवळ एक व्यक्ती गाडीमधील काही कुत्रे सोडत आहे, अशी माहिती काही गावकऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन चालक अल्ताप शेख याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही कुत्रे संगमनेर येथे पकडली असल्याचे सांगितले. मात्र, अधिक चौकशी केली असता संबंधित चालक हा विनापरवाना अकोले तालुक्यातील कुंभेफळ भागात कुत्रे सोडत असल्याचे समोर आले. त्यामुळे याप्रकरणी विनापरवाना कुत्र्यांची निर्दयतेने वाहतूक करणे, प्राण्यांना निर्दयतेने वागवणे असा गुन्हा अकोले तालुका पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पांडे करीत आहेत.

maharashtra times

बेकायदा वाहतूक

वाचा: ‘शरद पवारांच्या मुलाखतीनं कुठलीही खळबळ वगैरे माजणार नाही’

दरम्यान, संगमनेर तालुक्यात करोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे या तालुक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या तालुक्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. करोना प्रादुर्भाव आपल्या तालुक्यात, गावात होऊ नये, यासाठी संगमनेर भागातून आपल्या भागात कोणी आले आहे का, तो क्वारंटाइन झाला आहे का, त्याला काही लक्षणे आहेत का, याची माहिती नागरिकांकडून घेण्यात येत आहे. त्यातच अकोले तालुक्यातील काही गावांमध्ये संगमनेर येथील मोकाट कुत्रे सोडण्यासाठी संगमनेरमधील रहिवासी असणारी व्यक्तीच आल्याचा प्रकार समोर आला आहे.

वाचा: फेरीवाल्यांचं काय होणार?; राज्य सरकारनं कोर्टात सांगितलं!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)