Treat corona suspects Guardian Minister Eknath Shinde zws 70 | करोना संशयितांना उपचार द्या!

0
58
Spread the love

पालकमंत्र्यांचे खासगी डॉक्टरांना आवाहन

ठाणे : करोना संशयितांना अन्य रुग्णालयात पाठवण्याऐवजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करावेत. तसेच त्यांची करोनाची चाचणी करावी. चाचणी होकारात्मक आल्यास आणि प्रकृती स्थिर होताच त्यांना कोव्हिड रुग्णालयात हलवावे, अशी सूचना राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील खासगी डॉक्टरांना दिल्या.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या माध्यमातून रविवारी एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आयएमएचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी तसेच विविध ठिकाणाच्या एक हजाराहून अधिक खासगी डॉक्टरांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या सर्वाशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

आयएमएच्या ठाणे शाखेच्या माध्यमातून ५० फिजिशिअन आणि ७ इन्टेन्सिव्हिस्ट सोमवारपासून सेवा देणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, ही संख्या आणखी वाढण्याची गरज असून वैद्यकशास्त्रामध्ये विविध शाखांतील तज्ज्ञांनीही आपला नेहमीचा व्याप सांभाळून सरकारी कोव्हिड रुग्णालयांसाठी आपला वेळ द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. या वेबिनारमध्ये सहभागी झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेने रेमडेसिव्हिर, फॅबिफ्लू यांसारख्या अत्यावश्यक औषधांची खरेदी करण्याची सूचना यावेळी केली. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही रुग्णांना प्रथम दाखल करून घेऊन उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. या वेबिनारमध्ये वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे खजिनदार आणि आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकेर, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, राज्य सरकारच्या करोना टास्ट फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ठाण्यातील करोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. आनंद भावे, आयएमए ठाणेचे मावळते अध्यक्ष डॉ. दिनकर देसाई, भावी अध्यक्ष डॉ. संतोष कदम, फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित, ईएनटीतज्ज्ञ डॉ. आशिष भुमकर, डॉ. रीटा भिडे, डॉ. लता घनशामानी, ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा, एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष अजय आशर हेदेखील सहभागी झाले होते.

राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन विविध शहरांमध्ये आरोग्य व्यवस्थेची निर्मिती करत आहे. त्यामुळे या आरोग्य व्यवस्थेत मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी खासगी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा.

– एकनाथ शिंदे,  पालकमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 3:47 am

Web Title: treat corona suspects guardian minister eknath shinde zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)