Two corona patients were found in the house of a well-known political leader in Ichalkaranji msr 87|इंचलकरंजीतील लोकप्रतिनिधीच्या घरातच आढळले दोन करोनाबाधित

0
18
Spread the love

इचलकरंजी शहरातील आवाडे नगर परिसरामध्ये दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. एका नामवंत लोकप्रतिनिधीच्या घरातच दोन करोनाबाधित रुग्ण आढळले असून,  या लोकप्रतिनिधीचा मुलगा आणि नातू यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे..

त्यामुळे या कुटुंबीयांकडून आम्ही 14 दिवस गृह विलगीकरणात राहणार असल्याचा संदेश समाज माध्यमावर पाठवण्यात आला आहे. तसेच ‘आम्ही काळजी घेत आहोत; आपण ही काळजी घ्यावी’ असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. सध्या या दोघांवर कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीआहे.

इचलकरंजी शहराची कोरोनाबाधित रुग्ण संख्या ५३ वर पोहचली आहे. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी शहरासाठी योग्य तो कडक निर्णय घ्यावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. शहरातील नागरिकांनी घरी राहावे सुरक्षित राहावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात करोनामुळे आणखी एक मृत्यू झाला आहे. इचलकरंजीतील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसापूर्वी उपचारार्थ ‘सीपीआर’मध्ये दाखल केलेल्या या महिलेचा आज पहाटे सहा वाजता मृत्यt झाला. जिल्ह्यातील करोनाचा हा 14 वा बळी ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 10:59 am

Web Title: two corona patients were found in the house of a well known political leader in ichalkaranji msr 87


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)