Two terrorists have been killed in a joint operation of police, Army&CRPF in Kulgam nck 90

0
22
Spread the love

शनिवारी रात्री भारतीय सुरक्षा रक्षकांनी जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कुलगामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. पोलीस, आर्मी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रित केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतावदी ठार झाले आहेत. या दोन्ही दहशतावाद्यांची ओळख पटली आहे. या दोघांचाही संबंध हिजबुल या संघटनेशी आहे. यामधील एकाचं नाव अली भाई असून दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चकमक झालेल्या ठिकाणहून शस्त्रास्र आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 11:32 am

Web Title: two terrorists have been killed in a joint operation of police armycrpf in kulgam nck 90Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)