up panchayat election 2021: uttar pradesh election : यूपीत विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर! पंचायत निवडणुकीत भाजपला झटका; सपाची मुसंडी – up panchayat election 2021 ayodhya mathura varanasi bjp lose sp bsp winning

0
8
up panchayat election 2021: uttar pradesh election : यूपीत विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर! पंचायत निवडणुकीत भाजपला झटका; सपाची मुसंडी - up panchayat election 2021 ayodhya mathura varanasi bjp lose sp bsp winning
Spread the love


लखनऊः उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार ( uttar pradesh election ) आहे. यामुळे राज्यात होत असलेली पंचायत निवडणूक ( up panchayat election 2021 ) ही विधानसभा निववडणुकीचा ट्रेलर म्हणून बघितली जात आहे. चार पदांसाठी झालेल्या या पंचायत निवडणुकीचे निकल येत आहेत. यात समाजवादी पार्टी (सपा) पास होताना दिसतेय. अयोध्या, वाराणसी आणि लखनऊ या जिल्ह्यांमध्ये अखिलेश यादव यांच्या ‘सपा’ने ( samajwadi party ) भाजप भाजपला मागे ( up panchayat election bjp ) टाकले आहे. पण निवडणुकीचे अजून संपूर्ण निकाल यायचे बाकी आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वारणासी लोकसभा मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्यांच्या ४० जागांपैकी १४ जागा सपाने तर ८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. काही जागांचे निकाल येणं बाकी आहे. अयोध्येत भाजपचा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागतोय. येथील ४० पैकी २४ जागा सपाने जिंकल्या असून भाजपला फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. तर बसपाने ५ जागांवर विजय मिळवला आहे.

लखनऊ हा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. लखनऊ जिल्हा पंचायतील २५ जागांचे निकाल लागले आहे. यातील भाजप ३, समाजवादी पार्टी १०, बसपा ४ आणि इतरांनी ८ जागा जिंकल्या आहेत.

गोरखपूर हा उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. इथे ६८ पैकी भाजपने २० आणि समाजवादी पार्टीने १९ जागांवर विजय मिळवला आहे. आतापर्यंत ६५ जिल्हा पंचायत सदस्य निवडणुकीचे निकाल आहेत. सर्वाधिक २१ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत.

west bengal violence : ‘लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि TMC नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं’

फायनल निकाल आज येणार

उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीत जिल्हा पंचायत सदस्य, क्षेत्र पंचायत सदस्य, प्रधान आणि ग्राम पंचायत वार्ड सदस्य निवडीसाठी १२ लाख ८९ जहार ९३० उमेदवार मैदानात उतरले होते. राज्य निवडणूक आयोगानुसार सोमवारी रात्रीपर्यंत राज्यातील सर्वा जिल्ह्यांमधील २,३२,६१२ ग्राम पंचायत सदस्य आणि ३८३१७ प्रदान आणि ५५,९२६ पंचायत सदस्य आणि १८१ जिल्हा पंचायत सदस्य निवडले गेले आहेत. काही जागांचे निकाल लागणं बाकी आहे.

नंदीग्राममध्ये पराभवानंतरही ममता मुख्यमंत्री होणार? जाणून घ्या नियम…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)