Varun Dhawan helps 200 Bollywood dancers transfers funds directly into their accounts | दिलदार वरुण! २०० बॉलिवूड डान्सर्सच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले पैसे

0
26
Spread the love

करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन यांमुळे इतर क्षेत्रांसोबतच मनोरंजन विश्वावरही संकट कोसळलं आहे. सरकारने काही नियम आखत पुन्हा शूटिंग सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशातच अभिनेता वरुण धवनने २०० बॉलिवूड डान्सर्सच्या खात्यात मदत म्हणून काही पैसे ट्रान्सफर केले आहेत. सोशल मीडियावर वरुणच्या या दिलदारपणाचं कौतुक होत आहे.

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार, वरुणने २०० बॅकग्राऊंड डान्सर्सना आर्थिक मदत केली आहे. बॅकग्राऊंड डान्सर राज सुरानी याबद्दल म्हणाला, “वरुणने गरजू डान्सर्सची मदत केली आहे. त्याने डान्सवर आधारित तीन चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यामुळे डान्सर्सचं आयुष्य कसं असतं हे त्याने खूप जवळून पाहिलंय. म्हणूनच त्याने त्याच्या परीने या बॅकग्राऊंड्सची मदत केली आहे.”

आणखी वाचा : ‘बाहुबली’मधील कालकेयची खरी कहाणी माहितीये का?

वरुणने ‘एबीसीडी २’, ‘स्ट्रीड डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांमध्ये डान्सरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत चांगली ओळख झाली होती. त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत वरुणने ही मदत केली आहे. वरुणच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास तो ‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात सारा अली खान त्याच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 6:10 pm

Web Title: varun dhawan helps 200 bollywood dancers transfers funds directly into their accounts ssv 92Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)