vikas dubey funeral: गरज भासल्यास बंदुक हातात घेईन; विकास दुबेची पत्नी भडकली – wife of vikas dubey gets angry at media person during funeral in bhairav ghat in kanpur

0
35
Spread the love

कानपूर: ८ पोलिसांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी विकास दुबे याच्या पार्थिवावर कानपूरमधील भैरव घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी ऋचा दुबे, धाकटा मुलगा आणि मेहुणा दिनेश तिवारी उपस्थित होते. त्यावेळी भैरव घाटावर उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर विकास दूबे यांची पत्नी ऋचा दुबे संतापली. त्यावेळी ऋचा दुबेने आक्षेपार्ह भाषा देखील वापरली. एक दिवस तुमचाही येईल असे ऋचा दुबे म्हणाली. त्यावर विकास दुबेने कुणाच्या हत्या केल्या नाहीत का असा प्रश्न पत्रकारांनी ऋचा दुबेला विचारला. त्यावर होय केल्या होत्या… तुमचाही एक दिवस येईल. इथून निघून जा, जे जसे वागले त्याना मी तसाच धडा शिकवणार. गरज भासल्यास मी बंदूकही उचलेन, असे ऋचा दुबे संतप्त होऊन म्हणाली.

उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिस हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर विकास दुबेला शुक्रवारी सकाळी कानपूरपासून १७ किमीच्या अंतरावर असताना झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले. या चकमकीमध्ये विकास दुबेच्या छातीत तीन, तर कमरेला एक गोळी लागली होती. त्यानंतर हॉस्पीटलमधे आणल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर, विकासचा मृतदेह त्याचा मेहुणा दिनेश तिवारी यांच्याकडे देण्यात आला. अंत्यसंस्काराला विकास दुबेचे काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

कडक बंदोबस्तात विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला आणले जात होते. या ताफ्यात पोलिसांची एकूण तीन वाहने होती. ज्या गाडीत विकास दुबेला बसवण्यात आले होते, त्या गाडीच्या मागे आणि पुढे इतर दोन गाड्याही होत्या.

वाचा: विकास दुबेचे शव घेण्यास आईचा नकार

वडिलांनी अंत्यसंस्काराला न जाण्याचा घेतला निर्णय

विकास दुबेच्या आईने देखील विकास दुबेचे शव घेण्यास नकार दिला होता. त्याच्या आईने कानपूरला येण्यासही नकार दिला होता. मुलाच्या एन्काउंटरनंतर त्या प्रसारमाध्यमांसमोरही आल्या नाहीत. तसेच विकास दुबेच्या वडिलांनी देखील मुलाच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय घेतला.

वाचा: विकास दुबेचा एन्काउंटर खरा की खोटा?; काँग्रेसचे १३ प्रश्न

विकासवर ८ पोलिसांचीो हत्या करण्याचा आरोप

उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने विकास दुबेला शुक्रवारी सकाळी चकमकीत ठार केले. विकास दुबे यांच्यावर आठ पोलिसांची हत्या केल्याचा आरोप होता. कानपूर पोलिस हत्याकांड घडल्यापासूनच यूपी पोलिस विकास दुबेचा शोध घेत होते.

वाचा: ‘विकास दुबे संपला, परंतु त्याला कोणाकोणाचा पाठिंबा होता हे समोर आलेच पाहिजे’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)