Vikas Dubey: Vikas Dubey: विकास दुबेला कशी झाली अटक? संपूर्ण घटनाक्रम वाचा – vikas dubey arrested in ujjain eyewitness told how caught the most wanted gangster in kanpur encounter

0
90
Spread the love

उज्जैन: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ८ पोलिसांच्या निर्घृण हत्येनंतर फरार झालेला गँगस्टर विकास दुबे (Vikas Dubey) याला आज, गुरुवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक केली. पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेल्या विकास दुबेला महाकाल मंदिराच्या बाहेर ताब्यात घेतले. महाकाल मंदिराच्या एका सुरक्षा रक्षकानं आणि मंदिरात प्रसाद वाटणाऱ्या व्यक्तीनं विकासला ओळखण्यापासून ते त्याच्या अटकेपर्यंतची संपूर्ण घटना सांगितली.

महाकाल मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला रक्षक लखन यादव याने विकासच्या अटकेची घटना सांगितली. ‘सकाळी साधारण सात वाजले होते. त्यावेळी ही घटना घडली. त्याने मागील गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आम्ही लोकांनी त्याला पाहिलं. त्याचा संशय आला. त्यामुळे त्याला प्रवेश करण्यापासून रोखले. आम्ही आधीच विकास दुबेचा फोटो पाहिलेला होता. त्याचवेळी मी महाकालचं दर्शन घेण्यासाठी आलोय असं विकास दुबे म्हणाला. आम्ही त्याला मज्जाव केला. त्यानंतर प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याला कळवले,’ असे लखन यादव याने सांगितले.

maharashtra times

Vikas Dubey arrested: कानपूर एन्काउंटरमधील मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक

कानपूर एन्काउंटर: कोण आहे हा विकास दुबे?

विकास दुबे याने मंदिरात येऊन दर्शन घेतले नव्हते. आम्ही त्याच्याकडे चौकशी केली. तो एकटाच होता. आणखी दोन ते तीन जण तिथे होते. पण ते गर्दीतलेच होते असे आम्हाला वाटले. कदाचित ते त्याच्यासोबत असावेत. निश्चित काही सांगू शकत नाही. तो बहुतेक एकटाच असावा, असेही सुरक्षा रक्षकाने सांगितले. आता तो पोलीस कोठडीत आहे, असेही तो म्हणाला.

पसार होण्याच्या तयारीत होता विकास दुबे…

मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद देणाऱ्या गोपाल यानेही किस्सा सांगितला. प्रसाद देतेवेळी विकास दुबे माझ्याजवळ आला. बॅग आणि चपला कुठे ठेवू असं त्यानं मला विचारलं. त्याचवेळी सुरक्षा रक्षकाची नजर त्याच्याकडे गेली. हा विकास दुबे असल्याचे त्याने नेमके ओळखले. त्यानंतर तिथे बसवून त्याच्याकडे चौकशी केली. तसेच पोलीस चौकीत त्याच्याबद्दल माहिती दिली. त्याने तेथून पळ काढण्याचाही प्रयत्न केला. त्याच्याकडे पावतीही होती, असे गोपाल याने सांगितले.

maharashtra times

दुकानदाराने सर्वात आधी विकासला ओळखले

उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी याबाबत माहिती दिली. विकास दुबे याला महाकाल मंदिर परिसरात सर्वात आधी एका दुकानदाराने पाहिले. तेथील सुरक्षा रक्षकानेही संशय आल्याने त्याच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर विकासकडे चौकशी केली. त्याचवेळी त्याने धक्काबुक्कीचाही प्रयत्न केला. त्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवले. चौकशी केली असता, मी विकास दुबे असल्याचे त्याने सांगितले, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

या ठिकाणी विकास दुबेने घेतला आसरा…

सूत्रांच्या माहितीनुसार, कानपूरमधील गँगस्टर विकास दुबे हा उज्जैनला आला. त्याने एका दारुविक्रेत्याच्या घरात आसरा घेतला. तेथून तो निघाला आणि महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला. पोलिसांची निर्घृण हत्या केल्यानंतर पसार झालेल्या विकास दुबे याने ज्या दारूविक्रेत्याच्या घरी आसरा घेतला होता, त्या दारू विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी उज्जैनमधील महाकाल मंदिराबाहेर विकास दुबेला अटक करण्यात आली.

विकास दुबेवर ५० हजारांचं बक्षीस जाहीर, आई म्हणाली ‘ठार करा’

कानपूरमध्ये पोलिसांवर मोठा हल्ला; चकमकीत ८ पोलिस शहीद

maharashtra times

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)