Viral Video Mumbai Doctor Dances To Garmi In PPE Kit | Viral Video: मुंबईतील महिला डॉक्टर PPE कीटमध्येच ‘हाय गर्मी’वर थिरली; वरुण धवनही कमेंट करुन म्हणाला…

0
28
Spread the love

जगभरातील वेगवगेळ्या देशांमधील आरोग्य कर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टर करोनाच्या संकटाला धीराने तोंड देत आहे. यासाठी सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. दिवसोंदिवस करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाही सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांना बरं करण्यासाठी रात्रंदिवस झटताना दिसत आहेत. त्यातच करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक तास या कर्मचाऱ्यांना पीपीईमध्ये (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट) राहूनच रुग्णांवर उपचार करावे लागतात. या पीपीई कीटमध्ये अंगाची अगदी लाही लाही होते असा अनुभव डॉक्टर्स सांगतात. घामाने जणून काही अंघोळ केली आहे की काय असं वाटावं इतका घाम आलेले डॉक्टरांचे पीपीई कीट काढल्यानंतरचे काही फोटोही सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले होते.

एवढ्या कठीण परिस्थितीमध्येही स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टर करोनाबाधितांवर उपचार करत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता डॉक्टरांवरही प्रचंड मानसिक ताण आहे. कामाचे वाढीव तास, करोनाबाधितांची वाढती संख्या, आपल्या स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड अशा बऱ्याच गोष्टी एकाच वेळी डॉक्टरांना हाताळाव्या लागत आहेत. त्यातच परवा डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. डॉक्टर स्वत: मानसिक ताणाला सुट्टी देत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनाही वाढलेल्या लॉकडाउनसंदर्भात सकारात्मक रहावे असं आवाहन करण्यासाठी मुंबईतील एका तरुण महिला डॉक्टरने पीपीई कीट घालून डान्स करतानाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर डॉक्टर्स डेच्या दिवशीच पोस्ट केला आहे.

करोनायोद्धे असणारे डॉक्टर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून हसत हसत रुग्ण सेवा करत असून त्यांना सलाम करण्यासाठी मुंबईमधील रिचा नेगी या महिला डॉक्टरचेन पुढाकार घेतला आहे. “जरी आम्ही स्वत: या गर्मी होणाऱ्या मात्र तितक्याच सुंदर दिसणाऱ्या पोशाखामध्ये असतो तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये नकारात्मकतेला आम्ही दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून सकारात्मक राहू शकतो. तर तुम्हीही या वाढवलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये थोडं सकारात्मक राहणं गरजेचं आहे,” असं रिचा या पोस्टमध्ये म्हणते. डॉक्टर्स डे आणि १ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये महिनाभरासाठी वाढलेल्या लॉकडाउनची सांगड घालत रिचाने सर्व सामान्यांना या गोष्टींकडे सकारात्मक नजरेतून पाहा असं आवाहन केलं आहे.

नक्की वाचा >> …म्हणून या करोना केअर सेंटरवरील कर्मचारी PPE वर स्वत:चे हसरे फोटो लावून करतात रुग्णसेवा

रिचाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती पीपीई कीट घालून ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटातील ‘हाय गर्मी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

नक्की वाचा >> पारदर्शक PPE किटमध्ये लाँजरी घालून उपचार करणारी नर्स झाली मॉडेल; नोकरीही मिळाली परत

अभिनेता वरुण धवनही पडला प्रेमात

अनेकांनी तिचा डान्स पाहून तू खरोखर खूप सुंदर नाचते अशी प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवली आहे. हाय गर्मी या मूळ गाण्यात थिरकलेला अभिनेता वरुन धवननेही या पोस्टवर कमेंट केली असून त्याने फायर आणि हार्टचा इमोन्जी पोस्ट करत रिचाचे कौतुक केलं आहे.


या व्हिडिओला दोन दिवसांमध्ये ३ लाख ८४ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 8:59 am

Web Title: viral video mumbai doctor dances to garmi in ppe kit scsg 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)