Virat Kohli Adds A Twist To Hardik Pandya Fly Push-Ups see video | Video : कहानी में ट्विस्ट! हार्दिकच्या ‘फ्लाईंग पुश-अप्स’ला विराटचं झकास उत्तर

0
16
Spread the love

बॉलिवूड आणि क्रिकेट हे समीकरण भारतासाठी काही नवीन नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना साऱ्यांच्या नजरा याच जोडीवर होत्या. त्यांच्या लग्नानंतर आता चाहत्यांना गॉसिपसाठी एक नवी जोडी मिळाली आहे. ती म्हणजे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच. काही दिवसांपूर्वी हार्दिकने त्याची गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची गोड बातमी दिली. त्या बातमीनंतर पुन्हा एकदा हे दोघे चर्चेत आले होते.

हार्दिक पांड्या हा आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचा आहे. तो बऱ्याचदा आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. या वेळी हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. साहजिकच या अनोख्या पुश-अप्सची चाहत्यांना भुरळ पडली. केवळ चाहतेच नव्हे, तर बॉलिवूड अभिनेत्री आणि महिला क्रीडापटूही या पुश-अप्सवर फिदा झाल्याचे दिसून आले.

हार्दिकने पोस्ट केलेला व्हिडीओ –

हार्दिकच्या या व्हिडीओला कॅप्टन कोहलीने दमदार उत्तर दिलं. त्याने ‘फ्लाईंग पुश-अप्स’मध्ये थोडा ट्विस्ट करत नवा प्रकार शोधला. पुश-अप्स मारताना उड्या तर त्याने मारल्याच, पण त्यासह त्याने हवेत असताना टाळ्याही वाजवून दाखवल्या. या नव्या ट्विस्टवर चाहते भलतेच खुश झाले.

विराटने आणला ट्विस्ट –

हार्दिक मात्र या पुश-अप्सला कसं उत्तर देतो? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 7:05 pm

Web Title: virat kohli adds a twist to hardik pandya fly push ups see video vjb 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)