Wardha Corona enfected Deputy Collectors wife three children also positive Five new patients were found aau 85 |वर्धा: करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्याची पत्नी, तीन मुलंही पॉझिटिव्ह; पाच नवे रुग्ण आढळले

0
26
Spread the love

प्रशांत देशमुख

करोनाबाधित उपजिल्हाधिकारी यांची पत्नी, तीन मुलांसह पिपरी लग्न सोहळ्यातील एक जण असे पाच जण आज (रविवार) करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डावले यांनी माहिती दिली.

काल पाच व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याचे चित्र चिंताजनक आहे.

धुळे येथून परतलेल्या उपजिल्हाधिकारी यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र ते डॉक्टरकडे भेट देण्यासाठी गेल्याने अन्य कोणाच्या संपर्कात आले, याबाबत माहिती घेणे सुरू झाले आहे. तर दुसरीकडे काल एका लग्न सोहळ्यातील वर, वधू, मामाची मुलं, वधूच्या मैत्रिणी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आज एकजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. या लग्नात बरीच गर्दी झाल्याची माहिती नंतर मिळाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शहरात सध्या कडक संचारबंदी लागू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 8:44 am

Web Title: wardha corona enfected deputy collectors wife three children also positive five new patients were found aau 85


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)