Why Corona not control in pune? asks Ajit pawar and says Appoint IAS officer for testing scj 81 svk 88| “करोनाची साथ आटोक्यात का नाही? पुण्यात चाचण्यांसाठी आता IAS अधिकारी नेमा”

0
33
Spread the love

करोनाची साथ पुण्यात आटोक्यात का नाही येत? मुंबईत जर ही साथ नियंत्रणात येऊ शकते तर पुण्यात का नाही? असे प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चाचण्यांसाठी आता नवा प्रशासकीय अधिकारी नेमा अशा कडक शब्दांमध्ये पुण्यातल्या अधिकाऱ्यांना खास आपल्या शैलीत सूचना केल्या. काही रुग्णालयांमध्ये डॉक्टर कोविड कक्षांमध्ये जात नाहीत अशा तक्रारी आहेत. पुण्यात पुरेशा कोविड चाचण्या व्हाव्यात म्हणून पुण्यासाठी टेस्टिंग इनचार्ज IAS अधिकारी नेमा अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.

पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसह ग्रामीण भागांमधली करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पुणे जिल्ह्यासाठी टेस्टिंग इनचार्ज नेमा. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतेली एका अधिकाऱ्याची नेमणूक करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 10:31 pm

Web Title: why corona not control in pune asks ajit pawar and says appoint ias officer for testing scj 81 svk 88


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)