Why lockdown extended in pune these are the five reasons scj 81 | पुण्यात लॉकडाउन का? अजित पवारांनी सांगितली पाच कारणं

0
74
Spread the love

१३ जुलैपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुढचे १५ दिवस लॉकडाउन असणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आधी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन १२ जुलै रोजी संपतोय. त्यामुळे १३ जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाउन असणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. लॉकडाउन का वाढवण्यात आला? त्याची ही पाच कारणं अजित पवार यांनी दिली आहेत.

काय आहेत अजित पवार यांनी दिलेली कारणं?
१) पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक काही कारण नसताना घराबाहेर पडत आहेत

२) काही लोक मास्क न घालताना वावरत आहेत

३) करोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही

४) पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णसंख्या वाढली आहे

५) करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही नागरिक लॉकडाउनचे नियम पाळत नसल्याचं चित्र आहे

या पाच प्रमुख कारणांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउन १३ जुलैपासून पुढचे १५ दिवस वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० हजारांकडे गेली आहे. तर आत्तापर्यंत ९०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अजित पवार यांनी काही वेळापूर्वीच ही घोषणा केली आहे. अजित पवार यांनी पुढचे १५ दिवस लॉकडाउन असेल असं जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 3:23 pm

Web Title: why lockdown extended in pune these are the five reasons scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)