Why lockdown may extended in pune these are the five reasons scj 81 | पुण्यात लॉकडाउन का? अजित पवारांनी सांगितली पाच कारणं

0
25
Spread the love

१३ जुलैपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुढचे १५ दिवस लॉकडाउन होऊ शकतो असा इशारा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. आधी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन १२ जुलै रोजी संपतोय. त्यामुळे १३ जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर केला जाऊ शकतो असे संकेत अजित पवार यांनी दिलेत. पुण्यात जर पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन वाढला तर त्यामागे काय प्रमुख कारणं असतील? जाणून घ्या

पुण्यात लॉकडाउन वाढला तर पाच प्रमुख कारणं काय असतील?

१) पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक काही कारण नसताना घराबाहेर पडत आहेत

२) काही लोक मास्क न घालताना वावरत आहेत

३) करोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही

४) पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णसंख्या वाढली आहे

५) करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही नागरिक लॉकडाउनचे नियम पाळत नसल्याचं चित्र आहे

या पाच प्रमुख कारणांमुळेच बहुदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. एकीकडे देशात अनलॉक दोन सुरु झालंय. दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मात्र लॉकडाउन पुन्हा करावा लागतो अशी स्थिती आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० हजारांकडे गेली आहे. तर आत्तापर्यंत ९०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान काही वेळापूर्वी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउन आणखी पंधरा दिवसांनी वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 3:23 pm

Web Title: why lockdown may extended in pune these are the five reasons scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)