Woman molested after making false promise of marriage zws 70 | लग्नाचे आमिष दाखवून तरुणींचे शोषण

0
27
Spread the love

विक्रमगडच्या विवाहित भामटय़ाचे प्रताप; नवी मुंबई पोलिसांकडून बेडय़ा

वाडा :  विक्रमगड तालुक्यातील मौजे देहेर्जे येथील रहिवासी असलेल्या एका विवाहित भामटय़ाने लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ३० हून अधिक तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून तसेच त्यांच्या सोबत प्रेमाचे नाटक करून त्यांचे शारीरिक, आर्थिक व मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरे असे या भामटय़ाचे नाव असून रबाळे (नवी मुंबई) पोलिसांनी त्याला बलात्कारासह फसवणुकीच्या  गुन्ह्यखाली अटक केली आहे.

या भामटय़ाने आजवर १६ तरुणींना फसविले असल्याची माहिती पुढे येत असून अनेकींनी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन पाटील या भामटय़ाने लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर कधी अविवाहित, तर कधी घटस्फोटित, घटस्फोट घेण्याच्या तयारीत अशी माहिती देऊन अनेक तरुणींची फसवणूक केली आहे.

दिसायला देखणा असलेल्या या भामटय़ाने लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रता  एमबीए असून एका नामांकित कंपनीत पाऊण लाख रुपयांच्या उच्च पदावर काम करत असल्याची माहिती देऊन लग्नाळू मुलींना फसवून त्यांचे शोषण करीत असे.

वर्षभरापूर्वी या भामटय़ाने अशाच साइडवर खोटी माहिती देऊन एका वकील असलेल्या नवी मुंबईतील तरुणीला जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. वारंवार सांगूनही लग्न करीत नाही म्हणून या तरुणीने त्याच्या मूळगावी देहेर्जे ता. विक्रमगड येथे धाव घेतली. येथे आल्यानंतर या तरुणीला सचिनबाबत वेगळीच माहिती मिळाली.  सचिनने एका पत्नीला घटस्फोट दिला असून तो दुसऱ्या पत्नीसोबत ठाणे येथे राहात असल्याचे समजले. सचिनकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या वकील तरुणीने रबाळे पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. रबाळे पोलिसांनी सचिन या लखोबा लोखंडेला बेडय़ा ठोकल्या असून त्याच्यावर बलात्कार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्याने आजवर फसवणूक केलेल्या अनेक मुलींच्या तक्रारी पुढे येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:32 am

Web Title: woman molested after making false promise of marriage zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)