writer swanand kirkire tweet on vikas dubey encounter avb 95

0
21
Spread the love

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. गीतलेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन अशी मुशाफिरी करणारे स्वानंद किरकिरे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

स्वानंद हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते सामाजिक विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकताच त्यांनी विकास दुबे एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या लेखकाने असा असा सीन लिहिला तर किती फिल्मी आहे असे म्हटले गेले असते या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

आणखी वाचा : ‘आणि तरीही म्हणतात की बॉलिवूड….’, तापसी पन्नूचं विकास दुबे एन्काउंटरवर ट्विट

गुरुवारी विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या असून विकास दुबे ठार झाला. उत्तर प्रदेशांचे विशेष पोलीस पथक विकास दुबेला घेऊन कानपूरसाठी सकाळी निघाले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला आणि गाडी पलटली. गाडीचा अपघात झाल्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांचे शस्त्र खेचून घेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले पण त्याने माघार घेतली नाही. विकास दुबेने केलेल्या गोळीबारात विशेष पथकातील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबारात विकास दुबे जखमी झाला असता त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही संपूर्ण घटना एका चित्रपटाच्या स्क्रिप्ट प्रमाणे वाटत असल्याचे म्हटले जात होते. तर नेटकऱ्यांनी ही घटना रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या स्क्रीप्टसारखीच वाटत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 4:06 pm

Web Title: writer swanand kirkire tweet on vikas dubey encounter avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)