Young man commits suicide due to pubg game zws 70 | ‘पब्जी’च्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या

0
28
Spread the love

नागपूर : ‘पब्जी’ या ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी उघडकीस आली.

रितिक किशोर ढेंगे (२०, जुना फुटाळा) असे मृताचे नाव आहे. उपराजधानीतील पबजीचा हा नववा बळी असून यामध्ये तीन युवतींचाही समावेश आहे. रितिकचे वडील शिक्षक असून आई गृहिणी आहे. त्याला दोन भाऊ असून तो पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत होता. त्याचे शिक्षण शेवटच्या टप्प्यात होते. करोनामुळे महाविद्यालय बंद असल्याने तो नागपुरात आला होता. त्याला ‘पबजी’चे फार वेड होते. त्यामुळे तो अनेकदा भावंडांसह गप्पा करण्याऐवजी एकटा खोलीमध्ये पबजी खेळत बसायचा. शिक्षक असलेल्या वडिलांनी त्याला अनेकदा हटकले. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. रात्र-रात्रभर पबजी खेळत असल्याने त्याला अर्धशिशिचाही (मायग्रेन) त्रास झाला. त्याकरिता डॉक्टरकडे उपचारही सुरू होते. पबजी खेळताना अनेकदा हार-जीत होत असल्यामुळे तो मनाने खचत होता. गेल्या आठ दिवसांपासून तो तणावात होता.

बुधवारी दुपारी बारा वाजता सर्वानी जेवण केले. रितिक हा मोबाईल घेऊन त्याच्या रूममध्ये गेला. त्याने छताच्या पंख्याला दोरीने गळफास तयार केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही, म्हणून त्याच्या आईने आवाज दिला. खोलीतून प्रतिसाद न मिळाल्याने आईने दरवाजा लोटला.

रितिक गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितल्यानंतर आईने हंबरडा फोडला. सर्वानी खोलीकडे धाव घेतली. दोरी कापून रितिकला खाली उतरवले. त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 2:10 am

Web Title: young man commits suicide due to pubg game zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)