Zoom says they Planning significant investment and more hiring in India sas 89

0
23
Spread the love

लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम भारतात पुढील पाच वर्षांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. पुढील पाच वर्षांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

झूमच्या उत्पादन व अभियांत्रिकीचे अध्यक्ष वेल्चमी शंकरलिंगम यांनी, चीनशी संबंध नाकारण्याचा प्रयत्न करत झूम आणि चीनबद्दल काही गैरसमज निराशाजनक आहेत, असं ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. “आमची भारतीय बाजारावर पकड निर्माण होत असतानाच झूमबाबत काही गोष्टींबद्दल गोंधळ उडाला आहे. आम्हाला यातून बाहेर यायचं आहे”, असं सांगत झूम ही अमेरिकी कंपनी आसल्याचं शंकरलिंगम यांनी म्हटलंय.

“भारत आधीपण महत्त्वाचं मार्केट होतं आणि यापुढेही आमच्यासाठी ते महत्त्वाचं मार्केट असेल. पुढील पाच वर्षांमध्ये भारतात महत्त्वाची गुंतवणूक करण्याची आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आहे” असं  शंकरलिंगम यांनी सांगितलं. भारताने ५९ चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर झूम अ‍ॅपवरही बंदीची मागणी होत होती. त्यावर झूम ही अमेरिकी कंपनी असल्याचं सांगत शंकरलिंगम यांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने जिओमिट हे नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप लाँच केल्यानंतर आता झूमला भारतीय बाजारात चांगलीच टक्कर मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 4:55 pm

Web Title: zoom says they planning significant investment and more hiring in india sas 89Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)